आता ११ऐवजी १४ खेळाडू सामना खेळणार
By Admin | Updated: October 10, 2016 04:20 IST2016-10-10T04:20:43+5:302016-10-10T04:20:43+5:30
शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर

आता ११ऐवजी १४ खेळाडू सामना खेळणार
मुंबई : शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर केला असून, त्यानुसार शालेय क्रिकेट सामन्यात ११ऐवजी १४ खेळाडू खेळताना दिसतील.
विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची अधिक क्रेझ निर्माण करण्यासाठी एमसीएने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गाईल्स व हॅरिस शिल्ड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेद्वारे होईल. याबाबत, एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले की, ‘‘नुकताच एमसीएने १४ खेळाडू खेळविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, हॅरिश व गाईल्स शिल्ड स्पर्धेपासून हा निर्णय लागू करण्यात येईल.’’ सामन्यात प्रत्येक संघाला सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाजांसह उतरता येईल. (वृत्तसंस्था)