आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत, चव्हाण यांना नोटीस

By Admin | Updated: November 19, 2015 04:51 IST2015-11-19T04:51:08+5:302015-11-19T04:51:08+5:30

आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलप्रकरणी बुधवारी दिल्ली हायकोर्टाने क्रिकेटपटू

Notice to Sreesanth, Chavan for IPL spot fixing case | आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत, चव्हाण यांना नोटीस

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत, चव्हाण यांना नोटीस

नवी दिल्ली : आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलप्रकरणी बुधवारी दिल्ली हायकोर्टाने क्रिकेटपटू एस. श्रीसंत, अंकित चव्हाण यांच्यासह अन्य २३ जणांना नोटीस बजावली आहे.
सत्र न्यायालयाने २५ जुलै रोजी क्रिकेटपटूंना क्लीन चिट दिली होती. २ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात अपील केले. त्यावर न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी यातील सर्व ३६ जणांना नोटीस बजावली असून, १६ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. शिवाय, सत्र न्यायालयाचे रेकॉर्ड मागितले आहे. दिल्ली पोलीस मकोकाअंतर्गत डॉन दाऊद इब्राहिमसोबत आरोपींचे धागेदोरे आहेत, याबद्दल पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष होता. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी जावेद चुट्टानी, सलमान आनि एहतेशाम हे पाकिस्तानी नागरिक असून, त्यांच्यापर्यंत दिल्ली पोलीस पोहोचू शकले नव्हते.
दुसरीकडे पोलिसांनी कारण दिले की, ज्या आधारे आरोपींची सुटका करण्यात आली तो आधार खरा नव्हे. सत्र न्यायालय मकोकाची व्याख्या करण्यात अपयशी ठरले असून, आरोपींच्या गुन्ह्यांची योग्य चर्चा झालेली नाही.
सहा हजार पानांच्या आरोपपत्रांसोबत आजीवन बंदीचा सामना करणाऱ्या तीन खेळाडूंसोबत काही सट्टेबाज आणि अन्य ३६ आरोपींची नावेदेखील आहेत. मकोकासोबतच १२० ब (कट रचणे), ४१९ (बनवाबनवी) आणि ४२०(फसवणूक) या अंतर्गत खटला चालविण्यासाठी आम्ही पुरेसे पुरावे सादर केल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Notice to Sreesanth, Chavan for IPL spot fixing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.