भविष्यवाणी केली नाही -विल्सन
By Admin | Updated: July 3, 2014 04:39 IST2014-07-03T04:39:59+5:302014-07-03T04:39:59+5:30
फुटबॉल वर्ल्डकपमधील सामन्यांची आपण भविष्यवाणी केली नाही, असा खुलासा मॅच फिक्सर विल्सन राज पेरुमल याने केला आहे़

भविष्यवाणी केली नाही -विल्सन
रिओ दि जेनेरिओ : फुटबॉल वर्ल्डकपमधील सामन्यांची आपण भविष्यवाणी केली नाही, असा खुलासा मॅच फिक्सर विल्सन राज पेरुमल याने केला आहे़
पेरुमलने आपल्या पत्रकार मित्रासोबत आॅन लाईन चॅट करताना कॅमेरून संघ क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत ४-० ने पराभूत होईल, तसेच पूर्वांर्धात एका खेळाडूला मैदानाबाहेर पाठविले जाईल, अशी भविष्यावाणी केल्याचे वृत्त जर्मनीचे वृत्तपत्र स्पाईजेलमध्ये प्रकाशित झाले होते़
१८ जून रोजी झालेल्या सामन्यात पेरुमलने केलेली भविष्यावाणी खरी ठरली होती़ पेरूमलने वर्ल्डकपमधील सामन्यांची भविष्यवाणी केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे़ तो म्हणाला, स्पाईजेलच्या पत्रकारासोबत फेसबुक चॅट सामन्याच्या काही दिवसांनंतर म्हणजेचे २१ जूनला झाला होता़ माझ्या फेसबुक लॉगवर हे सर्व संभाषण उपलब्ध आहे़ फेसबुकवरील माझ्या संभाषणाचा गैरअर्थ लावला आणि त्यांनी उगीच हे प्रकरण उचलून धरले आहे़ (वृत्तसंस्था)