शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पुनरागमन नव्हे, ही तर सातत्यपूर्ण कामगिरी - तेजस्विनी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:07 AM

‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.

मुंबई :‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.कोल्हापूरच्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात सुवर्ण पदक तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. ती म्हणाली,‘जे मला ओळखत नाहीत, त्यांच्या मते हे पुनरागमन असू शकते. माझ्यामते माझा खेळातील प्रवास सातत्यपूर्ण असाच आहे. २०१४ च्या राष्टÑकुलनंतर कौटुंबिक कारणास्तव मी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर कामगिरी निराशाजनक झाल्याने माझी निवड होऊ शकली नव्हती. २०१५ नंतर मी भारतीय संघात अव्वल स्थानी असून कामगिरीही चांगली झाली आहे. मी दीर्घ ब्रेक घेत पुनरागमन केलेले नाही. राष्टÑकुल आणि आशियाड हे २०२० च्या आॅलिम्पिकची तयारी करण्यास मोलाची भूमिका बाजवतील.’नेमबाजीचा प्रवास कधीपर्यंत सुरू ठेवणार असा प्रश्न विचारताच तेजस्विनी म्हणाली,‘माझी आवड असेपर्यंत नेमबाजी सुरुच राहील. २०२० चे आॅलिम्पिक माझ्यासाठी मोलाचे आहे. आशियाड यातील एक टप्पा आहे. मी आणि प्रशिक्षक कुहीली गांगुली यांनी जो विचार केला तसेच घडले. आता आशियाडचे सुवर्ण मिळविणे लक्ष्य असेल.’ (वृत्तसंस्था)पदके शहीद जवानाला समर्पित...राज्य शासनाच्या क्रीडा विभागात सहायक संचालक असलेल्या तेजस्विनी सावंतने आपले पती समीर दरेकर आणि परिवाराला कौतुक सोहळा लांबवू नका, असे स्पष्ट शब्दात बजावले.यादरम्यान तिला मिळालेली पदके तिने पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेला औरंगाबादचा जवान किरण थोरातला समर्पित करीत वेगळेपण सिद्ध केले आहे.जवानांशी तेजस्विनीचे अतूट नाते...तेजस्विनी सावंत आणि भारतीय सैन्य दलाचे एक अतूट नाते आहे. तेजस्विनीचे आजोबा भारतीय सैन्यात होते. तिच्या वडिलांनी काही काळ भारतीय नौदलात काम केले.आपल्यालाही सैन्यात भरती होण्यासाठी संधी समोर आली होती, मात्र मला कुटुंब सोडून राहणे शक्य नसल्याने मी पुढे सैन्य दलात गेले नाही, असे सांगत तेजस्विनीने आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Sportsक्रीडा