रायपूर : पात्रता फेरीत तीन विजयांसह चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या मुख्य फेरीत दणक्यात प्रवेश करणा:या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचा हीच लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल. उद्या, शुक्रवारी ते मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघ केप कोब्राशी भिडणार आहेत. नॉर्दर्नची गोलंदाजीची बाजू भक्कम असल्याने कोब्राच्या फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यात भर म्हणून कोब्राचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींनीे त्रस्त असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्ससारख्या मजबूत संघाला हरवून न्यूझीलंडच्या नॉर्दर्न संघाने आपली क्षमता सिद्ध केली. त्यांचा मुकाबला 2क्क्9च्या उपांत्य फेरीत प्रवेश करणा:या केप कोब्राशी होणार आहे. कोब्राला मात्र त्यांचा अव्वल फलंदाज जे. पी. डय़ुमिनी याच्या दुखापतीने डोकेदुखी दिली आहे. कारण त्याव्यतिरिक्त संघातील मोजक्याच खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. ‘नॉर्दर्न’चे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असल्याने कोब्राची कसोटी लागणार हे खरे. याबाबत कोब्राचा कर्णर्धार जस्टिन ओनटाँग म्हणाला, दबावाचा सामना करण्याचा आणि संघात समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. आमच्या खेळाडूंकडे फारसा अनुभव नसला तरी ते सातत्याने क्रिकेट खेळत आहेत.
डय़ुमिनीच्या अनुपस्थितीत संघात हाशिम आमला, ओनटॉँग आणि रॉबिन पीटरसन हे अनुभवी फलंदाज असून, गोलंदाजीत वेर्नोन फिलेंडर आणि रोरी क्लेनवेल्ट यांच्यावर मदार आहे. नॉर्दर्नकडे केन विलियम्स व्यतिरिक्त स्कॉट स्टायरस, बी. जे. वॅटलिंग आणि कर्णधार डेव्हिड फ्लॅन हे चांगल्या फॉर्मातील फलंदाज आहेत. ट्रेट बोल्ट आणि टीम साउथी अचूक मारा करण्यास सक्षम आहेत. (वृत्तसंस्था)
संभाव्य संघ
केप कोब्रा : जस्टिन ओनटाँग (कर्णधार), हाशिम आमला, जे. पी. डय़ुमिनी, जस्टिन कँप, क्लेनवेल्ट, चार्ल लँगवेल्ट, रिचर्ड लेवी, अॅव्यू मॅगजिमा, रॉबिन पीटरसन, वेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड, जाखेले क्युबे, ओम्फिल रामेला, स्टीआन वॅज, डॅल वेलास
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट : डॅनिएल फ्लॅन (कर्णधार), ईश सोधी, जोनो बोल्ट, ब्रॅड विल्सन, केन विलियम्सन, बी. जे. वॅटलिंग, ग्रॅमी अॅल्ड्रीज, अॅन्टोन देवसिक, टीम साउथी, स्कॉट कुग्गेलेजिन, डॅर्ले मिचल, डॅनिएल हॅरिस, स्कॉट स्टायरस, ट्रेंट बोल्ट, मिचल सांटनर