फॉर्मची चिंता नाही : पुजारा
By Admin | Updated: July 29, 2016 19:25 IST2016-07-29T19:25:00+5:302016-07-29T19:25:00+5:30
मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या खराब फॉर्मचा बचाव केला. मला फॉर्मची चिंता नाही. लवकरच मोठी खेळी करणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले आहे.

फॉर्मची चिंता नाही : पुजारा
ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. २९ : मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या खराब फॉर्मचा बचाव केला. मला फॉर्मची चिंता नाही. लवकरच मोठी खेळी करणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले आहे. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने पहिल्या सामन्यात केवळ १६ धावा केल्या.
कसोटीतील गेल्या सहा डावांत त्याने एकही अर्धशतक झळकविलेले नाही. तो म्हणाला,ह्यगेल्या काही सामन्यात माझा खेळ बहरू शकला नव्हता. त्याआधी द. आफ्रिकेतील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर धावा केल्या. आता पुन्हा एकदा यश्स्वी कामगिरीसाठी सज्ज आहे. दुसऱ्या कसोटीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देईल, अशी आशा आहे.