बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा

By Admin | Updated: May 12, 2016 21:16 IST2016-05-12T21:16:17+5:302016-05-12T21:16:17+5:30

प्रीती झिंटा यांनी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने सामना गमावल्यानंतर बांगरसोबत अपशब्दाचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले

No use of abusive with Bangar - Preeti Zinta | बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा

बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12- किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सहमालकीण प्रीती झिंटा यांनी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने सामना गमावल्यानंतर बांगरसोबत अपशब्दाचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
प्रीती झिंटा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सामना गमावल्यानंतर संजय बांगरला अपशब्दांचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडण केले. सामन्यानंतर मी संघाचे मेंटर वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांच्याशी फक्त चर्चा केली. त्यानंतर मी विजयी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदनही केले. मी आमच्या प्रशिक्षकाबद्दल कोणत्याही अवमानजनक शब्दांचा वापर केला नाही. मी कोणाबाबतही असे शब्द बोलू शकत नाही. मीडियामध्ये आलेले वृत्त चुकीचे व अतिशयोक्तपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रीती झिंटा म्हणाल्या की, ‘‘मी या नकारत्मकता आणि बकवासामुळे त्रस्त झाली आहे. काही पत्रकार वेळोवेळी चुकीचे लिहितात आणि सेलिब्रिटीज त्यांच्या निशाण्यावर असतात.’’
दुसरीकडे पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर यांनीदेखील ९ मे रोजी मोहालीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने पराभूत झाल्यानंतर प्रीती झिंटा यांनी अपशब्द वापरल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
बांगर यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले की, ‘आरसीबीविरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मालकांसोबत चर्चा होत होती. काही मीडियांनी याला वेगळे वळण दिले. चुरशीच्या सामन्यातील पराभवाने दु:ख होते; परंतु संघ चांगला खेळत आहे. मला कोणीही अपशब्द वापरले नाहीत. पंजाबचा संघ स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झुंजार कामगिरी करीत राहील.’’

अपशब्दाविषयी तक्रार नाही : शुक्ला
किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्यात कथितरूपाने अपशब्दाचा वापर होण्याविषयीच्या वादाविषयी कोणतीही तक्रार आली नसल्याचे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले.
याविषयी दोन्ही बाजूंकडून कोणतीही तक्रार आली नसून याबाबत काही माहिती नसल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ एका धावेने पराभूत झाल्यानंतर प्रीती झिंटा यांनी संजय बांगर यांना कथितरूपाने अपशब्दांचा उपयोग केल्याचे बोलले जात होते. याविषयी पत्रकारांनी शुक्ला यांना प्रश्न विचारला. याविषयी शुक्ला यांनी, संजय बांगर याने अपशब्दांचा उपयोग केल्याविषयी तक्रार केली नाही आणि प्रीती झिंटा यांनीही बांगरविषयी तक्रार केली नाही. त्यामुळे याविषयी काहीच माहिती नसल्यावर काय प्रतिक्रिया देणार, असे सांगितले.

Web Title: No use of abusive with Bangar - Preeti Zinta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.