शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात ‘नो चेंज’

By admin | Published: February 15, 2017 12:41 AM

आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून

मुंबई : आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून राष्ट्रीय निवडकर्त्यांनी संघात कोणताही बदल केलेला नाही. नुकताच झालेल्या एकमेव कसोटीत बांगलादेशला नमवणारा भारतीय संघ आॅस्टे्रलियाविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी, अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्र दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बांगलादेशविरुध्दही तो खेळला नव्हता, तर त्याच्या जागी पर्याय म्हणून कुलदीप यादवची संघात वर्णी लागली होती. मिश्रा अजूनही दुखापतीतून सावरलेला नसून एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने यादवचा समावेश असलेला १६ सदस्यांचा भारतीय संघ कायम ठेवला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील संघात स्थान मिळालेले नाही. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो जवळजवळ तंदुरुस्त झालेला होता. परंतु, यानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच, अजिंक्य रहाणे, जयंद यादव आणि हार्दिक पांड्या यांनी आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. मुरली विजय आणि केएल राहुल या सलामीवीरांकडून भारताला भक्कम सुरुवातीची अपेक्षा असेल. विजयने आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले असले, तरी राहुलला मात्र बांगलादेशविरुद्ध आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्याच्यावर विशेष जबाबदारी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासह मुंबईकर रहाणे व यष्टीरक्षक रिध्दिमान साहा यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा या स्टार अष्टपैलू खेळाडूंवरही भारताची मुख्य मदार असेल. दोघांचाही फिरकी मारा कागारुंना लोळवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. तसेच, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या त्रयीकडे वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)या मालिकेतील पहिला कसोटी सामना पुण्यामध्ये २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.बंगळुरु येथे ४ ते ८ मार्च दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळविण्यात येईल. यानंतर मालिकेतील अखेरचे दोन कसोटी सामने रांची (१६ - २० मार्च) आणि धर्मशाळा (२५-२९ मार्च) येथे खेळविण्यात येतील.पहिल्या दोन कसोटीसाठी संघविराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिध्दिमान साहा, रविचंद्रम आश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंद यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.