भारताच्या प्रांजलाकडून नाईतोला पराभवाचा धक्का

By Admin | Updated: May 5, 2016 20:52 IST2016-05-05T20:52:50+5:302016-05-05T20:52:50+5:30

भारताच्या प्रांजला येडलापल्लीने मुलींच्या एकेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून, अग्रमानांकित जपानच्या युकी नाईतोचा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळ उडवून दिली

Nitto's defeat from Pranjala of India | भारताच्या प्रांजलाकडून नाईतोला पराभवाचा धक्का

भारताच्या प्रांजलाकडून नाईतोला पराभवाचा धक्का

आयटीएफ कुमार टेनिस : हाँगकाँगच्या टँग ए चा खळबळजनक विजय
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ : भारताच्या प्रांजला येडलापल्लीने मुलींच्या एकेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून, अग्रमानांकित जपानच्या युकी नाईतोचा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळ उडवून दिली. आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे मुलांच्या गटात हाँगकाँगच्या टँग ए ने अग्रमानांकित जपानच्या तोरू होरीला पराभवाचा धक्का देत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या व पाचव्या मानांकित सध्याचा जागतिक क्र. ९४ असलेल्या प्रांजला येडलापल्ली हिने अव्वल मानांकित व जपानच्या जागतिक क्र.२९ असलेल्या युकी नाईतोचा ६-२, ३-६, ६-४ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना २ तास २ मिनिटे चालला.

या वेळी प्रांजला म्हणाली की, सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या सेटमध्ये भक्कम सुरुवात केली व हा सेट जिंकला; पण दुसऱ्या सेटमध्ये मला माझ्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही व काही क्षुल्लक चुकांमुळे या सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात ४-४ अशी स्थिती असताना, मी स्वत:ची सर्व्हिस राखली व पुढच्याच गेममध्ये युकीची सर्व्हिस भेदली व हा सेट जिंकून विजय मिळविला. प्रांजला ही हैदराबाद येथे १२वी इयत्तेत चिन्मया विद्यालयामध्ये शिकत आहे.

मुलांच्या गटात सातव्या मानांकित व हाँगकाँगच्या टँग ए. याने जपानच्या व अव्वल मानांकित तोरू होरीचा ६-२, ६-२ असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. आठव्या मानांकित व जपानच्या ताजिमा नाओकीने चीनच्या व चौथ्या मानांकित झाओ लिंगक्सीचा टायब्रेकमध्ये ७-६(५), ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या मानांकित व जपानच्या युता शिमीझुने चीनच्या व सहाव्या मानांकित लु चेंगझीचा ६-३, ३-६, ७-५ तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.
निकाल : उपांत्यपूर्व फेरी : मुली : प्रांजला येडलापल्ली (भारत,५) वि. वि. युकी नाईतो (जपान,१) ६-२, ३-६, ६-४; किम इजलुपस (फिलिपिन्स) वि. वि. नाहो सातो (जपान, ८) ६-२, ६-३; झियु वांग (चीन) वि. वि. महक जैन (भारत) ६-२, ६-0; यांग ली(चीन,६) वि. वि. झुओमा नी मा(चीन)७-५, ६-३;
मुले : टँग ए. (हाँगकाँग,७) वि. वि. तोरू होरी (जपान,१) ६-२, ६-२; ताजिमा नाओकी (जपान,८) वि. वि. झाओ लिंगक्सी (चीन,४) ७-६ (५), ६-२; युता शिमीझु (जपान,३) वि. वि. लु चेंगझी (चीन,६) ६-३, ३-६, ७-५; लिम अलबेर्टो (फिलिपिन्स,२) वि. वि. वाय तनाका (जपान,५)७-५, ६-१;
*दुहेरी गट : मुली : उपांत्यपूर्व फेरी : यान्नी लिऊ(चीन)/झियु वांग(चीन)वि.वि.झिमा डु(चीन)/युकी नाईतो(जपान)३-६, ६-३(१२-१०); रिफंती काफिआनी(इंडोनेशिया)/यांग लि(तैपैई)वि.वि.महक जैन/स्नेहल माने(भारत) ६-३, ६-२; अनरी नगाता/नाहो सातो(जपान)वि.वि.झुओमा निमा/मी झुओमा यु(चीन) ५-७, ६-२(१०-५); मायुका एकावा(जपान)/प्रांजला येडलापल्ली(भारत)वि.वि.खिम इगलुपास/हिमारी सातो ६-४, ७-६(५); मुले : तोरू होरी / युनोसुकी तनाका वि.वि.सिद्धांत बांठिया/रिंपी कवाकामी ६-१, ७-५; एन.बल्लेकेरी रवीकुमार / लिम अल्बेर्टो वि.वि.सिआन यंग हन/चिंग लम ६-३, ६-२; युता शिमिझु / नाओकी ताजिमा वि.वि.व्होराचान रापुआंगचॉन / अँथोनी टँग ६-३, ६-२; चेंगझी लिऊ / लिंगक्सी झाओ वि.वि.ताओ मु / चुन सिन सेंग ७-६(४), ७-६(२). 
 

Web Title: Nitto's defeat from Pranjala of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.