निहाल, दिव्याने आफ्रिकेत फडकवला तिरंगा
By Admin | Updated: September 30, 2014 01:11 IST2014-09-30T01:11:25+5:302014-09-30T01:11:25+5:30
येथे पार पडलेल्या विश्व युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत भारताच्या निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी 1क् वर्षाखालील गटात जेतेपद पटकावून आफ्रिकेत तिरंगा फडकवला.

निहाल, दिव्याने आफ्रिकेत फडकवला तिरंगा
>डर्बन : येथे पार पडलेल्या विश्व युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत भारताच्या निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी 1क् वर्षाखालील गटात जेतेपद पटकावून आफ्रिकेत तिरंगा फडकवला. याव्यतिरिक्त भारताने विविध गटांत चार पदकांची कमाई केली आहे.
18 वर्षाखालील गटात वैभव सुरी आणि 1क् वर्षाखालील गटात अरविंद चिथांबरम यांनी रौप्य, तर ल्युक मेंडोंसा (1क् वर्षाखालील मुले) आणि वैशाली रमेश बाबू (14 वर्षाखालील मुली) यांना आपापल्या गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दिव्याने अखेरच्या फेरीत कझाकिस्तानची नुरगली नजरके हिच्यासोबतची लढत बरोबरीत राखली आणि 11पैकी 1क् गुणांची कमाई केली. तिने या जेतेपदासह हॅट्ट्रिक साजरी केली. या कामगिरीसह तिने प्रियांका नुटाक्की (2क्12) आणि सायना सलोनिका (2क्13) यांच्या पावलावर पाऊल ठेवले. तसेच भारताच्या कोनेरू हम्पी (1997)नंतर विश्व अजिंक्यपद स्पध्रेत बाजी मारणारी दिव्या पहिली खेळाडू बनली आहे. (वृत्तसंस्था)