पुढील वर्षी टष्ट्वेंंटी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात
By Admin | Updated: January 30, 2015 06:07 IST2015-01-30T01:00:12+5:302015-01-30T06:07:08+5:30
२०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

पुढील वर्षी टष्ट्वेंंटी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात
दुबई : २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आज आयसीसीने बोर्डाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली.
आयसीसीच्या मुख्यालयात एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयसीसीने २०१९ पर्यंतच्या कार्यक्रमाला मंजुरी प्रदान केली. २०१६ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद २०१३ मध्येच निश्चित झाले होते; पण कालावधीची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली. आयसीसी बोर्डाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा कालावधी निश्चित केला. इंग्लंडमध्ये १ जून ते १९ जून २०१७ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडला सोपविण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १५ जून २०१९ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. महिला विश्वकप स्पर्धा २०१७ मध्ये ४ ते २७ आॅगस्ट या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार असून, महिला टी-२० विश्वकप स्पर्धा २०१८ मध्ये विंडीजमध्ये २ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)