विराट 150 च्या पुढे, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

By Admin | Updated: February 10, 2017 11:52 IST2017-02-10T10:45:53+5:302017-02-10T11:52:25+5:30

बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर दुस-या दिवशीही भारताने चांगली सुरुवात केली आहे.

Next to Virat 150, Ajinkya Rahane's half century | विराट 150 च्या पुढे, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

विराट 150 च्या पुढे, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 10 - बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर दुस-या दिवशीही भारताने चांगली सुरुवात केली आहे. गुरुवारी 111 धावांवर नाबाद असलेला कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपपाली अर्धशतके पूर्ण केली. 
 
कोहली व्यक्तीगत 150 धावांच्या पुढे खेळत आहे तर, रहाणेने अर्धशतक झळकावले. तो 70 धावांच्या पुढे आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन बाद 356 धावा केल्या होत्या. 
 
सकाळच्या सत्रात विराट-रहाणे जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. पहिल्या दिवशी विजयने १०८ आणि चेतेश्वर पुजाराने ८३ धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. 

Web Title: Next to Virat 150, Ajinkya Rahane's half century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.