सिंधू पुढील फेरीत

By Admin | Updated: November 26, 2015 00:30 IST2015-11-26T00:30:24+5:302015-11-26T00:30:24+5:30

स्टार खेळाडू पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने कोरियाची किम मिन हिच्यावर चुरशीच्या लढतीत विजयासह मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी पुढील फेरी गाठली

In the next round, | सिंधू पुढील फेरीत

सिंधू पुढील फेरीत

मकाऊ : स्टार खेळाडू पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने कोरियाची किम मिन हिच्यावर चुरशीच्या लढतीत विजयासह मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी पुढील फेरी गाठली, पण दुसरी मानांकित जोडी असलेली ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पहावे लागले.
भारताच्या सिंधूने ४१ मिनिटांत २१-१३, २२-२० अशा गेममध्ये सामना जिंकला. ज्वाला-अश्विनी यांना जपानची यूकी फुकुशिमा- सयाका हिरोता यांच्याकडून ३६ मिनिटांत १६-२१, १५-२१ ने पराभवाचा धक्का बसला. पुरुष गेडात नववा मानांकित अजय जयराम हा देखील चीनचा लिन गुईपू याच्याकडून ११-२१, १७-२१ ने पराभूत झाला.
सातवा मानांकित एच. एस. प्रणय आणि १५ वा मानांकित बी. साई प्रणित यांनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळवित भारतीय आव्हान कायम राखले आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात प्रणितने उझबेकिस्तानचा आर्टियोम सावातयूगिन याचे आव्हान २४ मिनिटांत २१-११, २१-८ ने मोडित काढले.
प्रणयने विश्व क्रमवारीत २९९ व्या स्थानावर असलेला चायनीज तायपेईचा लिन चिया याचा ३२ मिनिटांत २१-१९, २१-१५ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: In the next round,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.