पावसामुळे न्यूझीलंड विजयापासून वंचित

By Admin | Updated: March 30, 2017 01:14 IST2017-03-30T01:14:44+5:302017-03-30T01:14:44+5:30

पावसामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा अखेरचा कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ

New Zealand wins from wins due to rain | पावसामुळे न्यूझीलंड विजयापासून वंचित

पावसामुळे न्यूझीलंड विजयापासून वंचित

हॅमिल्टन : पावसामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा अखेरचा कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ विजय मिळवण्यापासून आणि मालिकेत बरोबरी साधण्यापासून वंचित राहिला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आज दुसऱ्या डावात ५ बाद ८0 या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करणार होता आणि न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजीला उतरवण्यासाठी ९५ धावा त्यांना करायच्या होत्या.
पहिल्या चार दिवसांत पावसाचा व्यत्यय आला आणि अखेरच्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला
नाही. ही खूपच निराशाजनक बाब आहे. अखेरच्या दिवशी आम्ही पूर्ण तयारीने खेळू इच्छित होतो, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने म्हटले.
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : ३१४. दुसरा डाव : ३९ षटकांत ५ बाद ८0. न्यूझीलंड (पहिला डाव) : ४८९.
(वृत्तसंस्था)

Web Title: New Zealand wins from wins due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.