न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: June 3, 2015 00:33 IST2015-06-03T00:33:26+5:302015-06-03T00:33:26+5:30
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडच्या आठ विकेटस मिळवून सामन्यावर फास आवळला आहे

न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर
लीडस : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडच्या आठ विकेटस मिळवून सामन्यावर फास आवळला आहे. सकाळी बिनबाद ४४ वरुन पुढे खेळताना इंग्लंडची धावसंख्या ८ बाद २0६ अशी संकटमय झाली होती.
आज सकाळच्या सत्रात जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि स्पीनर मार्क क्रेग यांनी दोन दोन बळी मिळविले. पार्टटाईम स्पीनर केन विलियम्सनने उपहारापूर्वी बेन स्टोक्सला बाद केले.
इंग्लंडने आज दिवसाच्या चौथ्याच षटकात सलामीवीर अॅडम लिथ (२४) याचा बळी गमावला. बोल्टच्या गोलंदाजीवर विकेटकिपर ल्यूक राँंचीने त्याचा झेल घेतला. डावखुरा जलदगती गोलंदाज बोल्टने यानंतर गॅरी बॅलेन्स (६) याचा त्रिफळा उडवून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. या धक्कयातून सावरण्याची संधी क्रेगने इंग्लंडला मिळू दिली नाही. त्याने केवळ तीन चेंडूत इयान बेल (१) आणि जो रुट (0) यांना तंबूत पाठवून इंग्लंडची नौका हादरवून सोडली. यावेळी इंग्लंडची अवस्था ४ बाद ६२ अशी झाली होती. बेन स्टोक्स याने दुसऱ्या बाजूला उभे असलेल्या कर्णधाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण विलियम्सनने आपल्या पाचव्या चेंडूवर त्याला बाद करुन ही भागीदारी संपुष्टात आणली. उपहारानंतरही यजमान संघाची गळती सुरुच राहीली. कामचलाउ फिरकी गोलंदाज म्हणून मॅक्युलमने विलियम्सनचा वापर केला परंतु तो न्यूझीलंडसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. (वृत्तसंस्था)