न्यूझीलंड-द.आफ्रिका कसोटी अनिर्णीत

By Admin | Updated: March 13, 2017 03:30 IST2017-03-13T03:30:18+5:302017-03-13T03:30:18+5:30

पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना रविवारी अनिर्णीत संपला

New Zealand-South Africa Test draw | न्यूझीलंड-द.आफ्रिका कसोटी अनिर्णीत

न्यूझीलंड-द.आफ्रिका कसोटी अनिर्णीत

ड्युनेडिन : पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना रविवारी अनिर्णीत संपला. पंचांनी उपाहारापर्यंत प्रतीक्षा केली आणि पाऊस थांबण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नसल्यामुळे सामना अनिर्णीत संपल्याचे जाहीर केले. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ६ बाद २२४ धावांची मजल मारली होती. त्यांनी १९१ धावांची आघाडी घेतली होती. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून वेलिंग्टनमध्ये खेळल्या जाणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा दुखापतग्रस्त फलंदाज रॉस टेलर गुरुवारपासून वेलिंग्टनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. ड्युनेडिनमध्ये पहिल्या कसोटी
सामन्यादरम्यान टेलरला दुखापत झाली होती. वेलिंग्टनमध्ये तो खेळू शकणार नाही, असे संघाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: New Zealand-South Africa Test draw