कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला धक्का

By Admin | Updated: September 18, 2016 15:39 IST2016-09-18T15:39:45+5:302016-09-18T15:39:45+5:30

भारताविरूद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी दुखापतग्रस्त

New Zealand push ahead of Test series | कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला धक्का

कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला धक्का

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.18- भारताविरूद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी  न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो भारताविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार आहे. 
ट्रेनिंग दरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. उपचारासाठी त्याला मायदेशी परत बोलावण्यात आले असून वेगवान गोलंदाज मॅट हॅन्री त्याची जागा घेणार असल्याचं वृत्त आहे. मात्र, वन-डे मालिकेसाठी फिट होऊन साऊदी भारतात परतेल अशी अपेक्षा न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केली आहे.
साऊदी हा न्यूझीलंडच्या संघामधला सध्याचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्यानं 52 कसोटी सामन्यांमध्ये 177 विकेट्स काढल्या आहेत. 

Web Title: New Zealand push ahead of Test series