न्यूझीलंड जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30

न्यूझीलंड जोड
>स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल मॅक्लॉयड व हामिश गार्डिनर यांना बाद केले. या दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. टीम साऊदीने केली कोएत्झर (१) व कर्णधार पे्रस्टन मोमेसन (०) यांना बाद करीत स्कॉटलंडची ४ बाद १२ अशी अवस्था केली होती. मचान व बॅरिंग्टन यांनी पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मचानने ७९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकार लगाविला, तर बॅरिंग्टनने ८० चेंडू खेळताना ४ चौकार व १ षटकार लगाविला. ॲन्डरसनने मचानला माघारी परतवित ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला. ॲन्डरसनने दोन फलंदाजांना माघारी परतवले, तर उर्वरित तीन विकेट डॅनियल व्हेटोरीने घेतल्या. (वृत्तसंस्था)०००००