न्यूझीलंडला छोट्या चमत्काराची गरज

By Admin | Updated: October 4, 2016 03:20 IST2016-10-04T03:20:15+5:302016-10-04T03:20:15+5:30

न्यूझीलंडवर मिळवलेल्या दणदणीत विजयासह टीम इंडियाने केवळ कसोटी मालिका जिंकली नसून आयसीसी कसोटी क्रमवारीत अग्रस्थानही पटकावले आहे.

New Zealand need a little miracle | न्यूझीलंडला छोट्या चमत्काराची गरज

न्यूझीलंडला छोट्या चमत्काराची गरज

न्यूझीलंडवर मिळवलेल्या दणदणीत विजयासह टीम इंडियाने केवळ कसोटी मालिका जिंकली नसून आयसीसी कसोटी क्रमवारीत अग्रस्थानही पटकावले आहे. आता पुढील सामना इंदूर येथे होत असून, येथील खेळपट्टी ईडन गार्डनच्या तुलनेत नक्कीच आव्हानात्मक नसेल. परंतु, सध्या भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांवर ज्याप्रकारे वर्चस्व राखले आहे, ते पाहता हे दडपण झुगारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. केन विलियम्सनची गैरहजेरी पाहुण्या संघाला चांगलीच जाणवली. त्याच्याकडे उत्कृष्ट तंत्र आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्याची त्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, ईडन गार्डनच्या वर- खाली राहणाऱ्या खेळपट्टीवर त्याची खेळी आव्हानात्मक ठरली असती. त्याचप्रमाणे टॉम लॅथमने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करून आपण न्यूझीलंड फलंदाजीचा भविष्य असल्याचे सिद्ध केले. त्याने अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर कोणतेही धोकादायक फटके मारले नाहीत. तसेच, त्याच्या संयमी स्वभावाने संघातील इतर खेळाडूंनाही प्रेरित केले असणार. पण, त्याची कामगिरी संघाचा पराभव टाळू शकली नाही.
दुसरीकडे, यजमान टीम इंडियाने रोहित शर्मावर दाखवलेल्या विश्वासाने तो खूष असेल. शर्माने संघाचे अव्वल चार फलंदाज बाद झाले असताना सामनावीर ठरलेल्या वृद्धिमान साहासह महत्त्वपूर्ण भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंड व भारताच्या फलंदाजीतील फरक स्पष्ट झाला. भारताच्या या परिस्थितीमध्ये कोणत्याही माऱ्याला सामोरे जाण्याची क्षमता रोहित शर्मामध्ये आहे आणि त्याच्या बिनधास्त वृत्तीमुळे सामना न्यूझीलंडपासून दूर गेला. तसेच, रोहितने ईडन गार्डनवर खेळतानाच शतक झळकावून कसोटी पदार्पण केले होते. शिवाय त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक २६४ वैयक्तिक धावांचा विश्वविक्रमही याच मैदानावर केला. कोणत्याही खेळाडूला विचारा, कोणत्या तरी एका मैदानावर तो खेळाडू अजिंक्य असतो आणि
ईडन गार्डनवर रोहित शर्मा नक्कीच अजिंक्य आहे.
भारताच्या चार गोलंदाजांसह खेळण्याच्या योजनेला गोलंदाजांनी योग्य न्याय देताना मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात भुवनेश्वरकुमार आणि मोहंमद शमी यांनी वर्चस्व गाजवताना अश्विन आणि जडेजा यांना जम बसविण्याची संधी दिली. तर, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला इंदूरमध्ये क्लीन स्विप रोखण्यासाठी छोट्या चमत्काराची गरज आहे.
(पीएमजी)

Web Title: New Zealand need a little miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.