हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर मात
By Admin | Updated: October 7, 2015 03:05 IST2015-10-07T03:05:06+5:302015-10-07T03:05:06+5:30
भारतीय हॉकी संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला. मंगळवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्युझीलंडने ०-२ असा विजय मिळवला.

हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर मात
नेल्सन : भारतीय हॉकी संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला. मंगळवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्युझीलंडने ०-२ असा विजय मिळवला.
न्यूझीलंड ए टीमच्या विरोधात मागच्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र राष्ट्रीय संघाचे आव्हान भारताला पेलवले नाही. सामन्याच्या ुसुरूवातीला दोन्ही संघांनी आक्रमकता दाखवली. मात्र न्यूझीलंडने भारतीय संघाला आघाडी मिळू देण्याची कोणतीही संधी दिली नाही.
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी बराच काळ चेंडू आपआपल्या ताब्यात ठेवला. मात्र पाचव्या मिनिटातच न्युझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. निक हेग याने कोणतीही चुक केली नाही. भारत त्यानंतर दबावात आला. त्यानंतर भारताने जोरदार आक्रमण केले. निकिन तिमैया याने चेंडूला गोलपोस्टपर्यंत पोहचवले. मात्र किवी संघाने उत्तम बचाव करत भारताला आघाडी घेण्याची संधी दिली नाही.