शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवी सम्राज्ञी

By admin | Updated: January 31, 2016 03:14 IST

जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने धडाकेबाज प्रदर्शन करीत जागतिक नंबर वनची खेळाडू गत चॅम्पियन सेरेना विल्यम्सचे साम्राज्य उद्ध्वस्त करीत आॅस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी

मेलबोर्न : जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने धडाकेबाज प्रदर्शन करीत जागतिक नंबर वनची खेळाडू गत चॅम्पियन सेरेना विल्यम्सचे साम्राज्य उद्ध्वस्त करीत आॅस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला.सातव्या मानांकित केर्बरने अग्रमानांकित सेरेनाला दोन तास आठ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात ६-४, ३-६, ६-४ असे हरवून वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले. केर्बरच्या विजयामुळे सेरेनाच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्याचे स्वप्नाचा चुराडा झाला. सेरेनाला गेल्या वर्षी यूएस ओपनमध्येही अपयशाचा सामना करावा लागला होता. या वर्षीची तिची सुरुवातही निराशेनेच झाली. केर्बरचे सेरेनासोबत करिअर रेकॉर्ड १-५ असे होते, पण जर्मन खेळाडूने आज सगळे हिशेब एकत्रित चुकते करताना नवीन इतिहास रचला. विजेतेपदाच्या आनंदाने केर्बरने उडी मारली. सेरेनानेही तिचे अभिनंदन केले. ओपन युगात ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टेफी ग्राफनंतर केर्बर दुसरी जर्मन खेळाडू बनली आहे. स्टेफीनंतर १७ वर्षे जर्मनीत ग्रँडस्लॅम विजेता घडला नव्हता ती कसर केर्बरने भरून काढली. दोन तासांचा संघर्ष....१ सेट पहिला : केर्बरने सेरेनाच्या चुकीचा पुरेपूर फायदा उठवला. तिने सेरेनाची सर्व्हिस दोन वेळा तोडताना ३९ मिनिटांतच हा सेट जिंकला.२ सेट दुसरा : सेरेनाने आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवत सामन्यात पुनरागमन करताना ३३ मिनिटांत हा सेट जिंकला. ३ तिसरा सेट : सामन्यात बरोबरी झाल्याने आपला अनुभव पणाला लावून सेरेना २२ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दृष्टीने आगेकूच करील, असे वाटत होते. या उलट केर्बरकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. तिने आपले सर्वस्व पणाला लावून ५-३ अशी आघाडी घेतली. सेरेनाने शेवटची धडपड करताना ४-५ असे अंतर कमी केले. परंतु दहावा गेम जिंकून हा निर्णायक सेट केर्बरने ६-४ असा आपल्या नावावर जिंकून इतिहास घडविला.सरेनाचे ग्रँडस्लॅम फायनल रेकॉर्ड २१-४ असे राहिले आहे. २००१ च्या यूएस ओपन आणि २००८ च्या विम्बल्डन फायनलमध्ये आपली व्हीनसकडून हरली होती. २००४ च्या विम्बल्डनमध्ये मारिया शारापोव्हा, तर २०११च्या यूएस ओपनमध्ये सामंथा स्तोसूर यांनी सेरेनाला हरवून विजेतेपद पटकावले होते. आज तिला २०१६ च्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये केर्बरने तिला हरवून तिचे ग्रँडस्लॅम रेकॉर्ड २१-५ असे केले. केर्बरसाठी मी आनंदित आहेत. तिने खरोखरच चांगला खेळ केला. माझी कामगिरीही चांगलीच झाली. प्रत्येक सामना मी जिंकू शकत नाही, कारण मी रोबोट नाही.- सेरेना विल्यम्समी आतापर्यंत खूप परिश्रम केले आहेत, म्हणून मी आज येथे आहे. आता मी ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे, असे अभिमानाने सांगू शकते. हे दोन आठवडे माझ्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय आठवडे ठरले आहेत.- एंजेलिक केर्बर