नेदरलँडचा सलग दुसरा विजय

By Admin | Updated: June 19, 2014 04:29 IST2014-06-19T00:51:10+5:302014-06-19T04:29:31+5:30

नेदरलँडने ऑस्ट्रेलियाचा येथे आज फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात संघर्षपूर्ण लढतीत ३-२ गोलने पराभव करताना सलग दुसरा विजय मिळवला

Netherlands second consecutive win | नेदरलँडचा सलग दुसरा विजय

नेदरलँडचा सलग दुसरा विजय

पोत्रोएलग्रे (ब्राझील) : नेदरलँडने ऑस्ट्रेलियाचा येथे आज फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात संघर्षपूर्ण लढतीत ३-२ गोलने पराभव करताना सलग दुसरा विजय मिळवला.
आपल्या गटातील पहिल्या लढतीत गतविजेत्या स्पेनचा ५-१ असा सफाया करणार्‍या नेदरलँडला विश्वचषकातील कमी रँकिंग असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताना मात्र आपली पूर्ण क्षमता पणाला लावावी लागली. या विजयामुळे नेदरलँड संघाचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
नेदरलँडचा संघ उत्तरार्धात ५४ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियन मिडफिल्डर माईल जेडीनेकच्या पेनल्टीवरील गोल मुळे १-२ फरकाने पिछाडीवर पडला होता. त्यानंतर फॉरवर्ड रॉबिन वॅन पर्सीच्या ५८ व्या मिनिट आणि मेंफिस डेपेने केलेल्या ६८ व्या मिनिटाच्या गोलच्या बळावर नेदरलँडने ही लढत जिंकली.
उत्तरार्धात नेदरलँडच्या अर्जेन रॉबेनने २0 व्या मिनिटाला सामन्याचा पहिला गोल केला, तर एकाच मिनिटातर ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम काहीलने गोल करताना १-१ अशी बरोबरी साधून दिली होती.
ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी ऑस्ट्रेलियाला चिलीने ३ विरुद्ध १ अशा गोलफरकाने पराभूत केले होते.

Web Title: Netherlands second consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.