नेपाळचा खळबळजनक विजय
By Admin | Updated: July 20, 2016 21:22 IST2016-07-20T21:22:49+5:302016-07-20T21:22:49+5:30
क्रिकेटमध्ये धडपडत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असलेल्या नेपाळ संघाने क्रिकेटविश्वातील खळबळजनक निकाल नोंदवताना थेट मेरिलेबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) एकदिवसीय

नेपाळचा खळबळजनक विजय
एमसीसीला नमवले : क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर केला पराक्रम
लंडन : क्रिकेटमध्ये धडपडत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असलेल्या नेपाळ संघाने क्रिकेटविश्वातील खळबळजनक निकाल नोंदवताना थेट मेरिलेबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) एकदिवसीय सामन्यात ४१ धावांनी लोळवले. या अनपेक्षित निकालाने क्रिकेटविश्वाचे लक्ष नेपाळने वेधून घेतले आहे.
जागतिक क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर््स मैदानावर पहिला वहिला सामना खेळताना नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांची समाधानकारक मजल मारली. नेपाळकडून ज्ञानेंद्र मल्ला (३९) आणि कर्णधार पारस खडका (३०) यांनी दमदार फलंदाजी केली.
नेपाळ व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांनी २०० वर्ष पुर्ण झाल्यानिमित्तान आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात नेपाळने सर्वांनाच चकीत करताना खळबळ माजवली. फलंदाजीनंतर अचूक गोलंदाजीनेही नेपाळने लक्षवेधी खेळ केला. विशेष म्हणजे सुमारे ५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात केवळ नेपाळचाच जयघोष होत होता.
नेपाळने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमसीसीचे फलंदाज नेपाळच्या फिरकीपटूंपुढे ढेपाळले. अडायरचा अपवाद वगळता एमसीसीचा एकही फलंदाज फारवेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. फिरकीपटूंनी केलेल्या अचूक माऱ्यापुढ एमसीसीचा डाव केवळ १७६ धावांत संपुष्टात आला. सागर पुन आणि बसंता यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना एमसीसीचे कंबरडे मोडले. (वृत्तसंस्था)
लॉडर््स मैदानावर मिळालेल्या या अप्रतिम विजयामुळे संघात उत्साह निर्माण झाला आहे. दरवेळी लॉडर््सवर खेळण्याची संधी मिळत नसते आणि त्यात हा विजय खूप महत्त्वपूर्ण ठरतो. माझ्यामते आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला आणि शानदार खेळ केला. या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
- पारस खडका, कर्णधार - नेपाळ