नेपाळ फुटबॉल संघप्रमुख दहा वर्षांसाठी निलंबित

By Admin | Updated: November 17, 2015 03:05 IST2015-11-17T03:05:25+5:302015-11-17T03:05:25+5:30

लाच घेतल्याप्रकरणी नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा यांना सोमवारी ‘फिफा’ने तब्बल १० वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याचवेळी लाओस संघाचे अध्यक्ष विफेट सिचाकर

Nepali Football Association chief suspended for ten years | नेपाळ फुटबॉल संघप्रमुख दहा वर्षांसाठी निलंबित

नेपाळ फुटबॉल संघप्रमुख दहा वर्षांसाठी निलंबित

ज्युरिख : लाच घेतल्याप्रकरणी नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा यांना सोमवारी ‘फिफा’ने तब्बल १० वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याचवेळी लाओस संघाचे अध्यक्ष विफेट सिचाकर यांच्यावरही दोन वर्षांची बंदी आणली आहे.
आधीच नेपाळच्या अनेक राष्ट्रीय खेळाडूंवर भ्रष्टाचाराचा आरोप असताना आता त्यामध्ये अखिल नेपाळ फुटबॉल संघचे अध्यक्ष गणेश थापा यांच्यावर एका दशकाची निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याने हा नेपाळच्या फुटबॉल क्षेत्राला मोठा झटका मानला जात आहे. थापा यांनी आपल्या १९ वर्षांच्या कार्यकाळामध्ये लाखो डॉलरची कमाई केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे याची चौकशी सुरू असतानाच एक वर्षापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. फिफाने एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली, की थापा यांनी अनेक वर्षे भ्रष्टाचार केला असून यामध्ये इतर फुटबॉल अधिकाऱ्यांकडून आपल्या परिवारासाठी व वैयक्तिक फायद्यासाठी लाच घेतल्याचा समावेश आहे. तसेच फिफाच्या नैतिक आयोगने सांगितले, की थापा यांना फिफा कार्यकारी समितीच्या २००९ आणि २०११ च्या निवडणुकांवेळी लाच देण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला लाओस फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष विफेट सिचाकर यांच्यावरही अन्य फुटबॉल अधिकाऱ्याकडून २०११ निवडणुकांच्यावेळी लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावरही २ वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Nepali Football Association chief suspended for ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.