आजपासून नेहरू चषक हॉकी स्पर्धा
By Admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:47+5:302014-08-28T23:09:47+5:30
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी नेहरू चषक जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सहभागी शाळेने सकाळी ९ वाजता चर्च मैदान येथे उपस्थित राहावे. या प्रसंगी राष्ट्रीय हॉकीपटूंचा सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर कला ओझा, मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, कमांडर विनोद नरवडे, प्रदीप खांड्रे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांची या प्रसंगी उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक एम. झेड. शेख यांच्याशी संपर्क

आजपासून नेहरू चषक हॉकी स्पर्धा
औ ंगाबाद : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी नेहरू चषक जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सहभागी शाळेने सकाळी ९ वाजता चर्च मैदान येथे उपस्थित राहावे. या प्रसंगी राष्ट्रीय हॉकीपटूंचा सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर कला ओझा, मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, कमांडर विनोद नरवडे, प्रदीप खांड्रे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांची या प्रसंगी उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक एम. झेड. शेख यांच्याशी संपर्क साधावा.