नेगीने चेन्नईला तारले, मुंबई इंडियन्ससमोर १५९ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 8, 2015 21:37 IST2015-05-08T21:37:06+5:302015-05-08T21:37:06+5:30
पवन नेगीच्या १७ चेंडूत ३६ धावांच्या खेळीने चेन्नई सुपर किंग्जला तारले असून चेन्नईने मुंबईला १५९ धावांचे आव्हान दिले आहे.

नेगीने चेन्नईला तारले, मुंबई इंडियन्ससमोर १५९ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ८ - पवन नेगीच्या १७ चेंडूत ३६ धावांच्या खेळीने चेन्नई सुपर किंग्जला तारले असून चेन्नईने मुंबईला १५९ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने २० षटकांत ५ गडी गमावत १५८ धावा केल्या असून धोनीने नाबाद ३९ धावांची खेळी केली आहे.
आयपीएलमध्ये प्ले ऑफ गाठण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स मैदानात उतरले असून मुंबईची लढत बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जशी सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतर्फे ब्रँडन मॅक्यूलम आणि ड्वॅन स्मिथ ही जोडी मैदानात उतरली. मॅक्यूलमने ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. या जोडीने ४.५ षटकांत धावफलकावर ४४ धावा केल्या. विनय कुमारने मॅक्यूलमला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर सुरेश रैना १० तर स्मिथ २७ धावांवर बाद झाला. फाफ डू प्लेसिसही स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईची स्थिती १५.२ षटकांत ४ बाद १०४ अशी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या पवन नेगीने सामन्याचे चित्र बदलले. नेगीच्या फटकेबाजीने चेन्नईला २० षटकांत १५८ धावा करता आल्या.