शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:51 IST

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय आणि जगातील आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सोनेरी घोडदौड कायम आहे. नीरजने झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

भारताचा गोल्डन बॉय आणि जगातील आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सोनेरी घोडदौड कायम आहे. नीरजने झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिसऱ्या प्रयत्नामध्ये ८५.२९ मीटल लांब भालाफेक करत नीरजने अव्वलस्थानासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तर दक्षिण आफ्रिकेच्या डोव्ह स्मिथ याने ८४.१२ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले. ग्रेनडाचा पीटर अँडरसन ८३.६३ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला होता. अंतिम फेरीत नीरजने फाऊलसह सिुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८३.४५ मीटर अंतर गाठले. तर तिसऱ्या प्रयत्नात ८५.२९ मीटर भालाफेक करत नीरजने क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात ८२.१७ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात ८१.०१ मीटर एवढी भालाफेक त्याने केली. तर शेवटच्या प्रयत्नात त्याने फाऊल केला.

यंदाच्या वर्षात नीरज चोप्राची कामगिरी सातत्यपूर्ण होत असून, त्याने पॅरिस डायमंड लीगनंतर सलग दुसऱ्या स्पर्धेत विजय मिळवला आहे. दरम्यान, नीरज चोप्रा याने यावर्षी दोहा डायमंड लीगमध्ये विक्रमी कामगिरी करताना पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला होता. या स्पर्धेत नीरजने ९०.२३ मीटर एवढी भालाफेक केली होती. मात्र या स्पर्धेत नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने ९१.०६ मीटर एवढी भालाफेक करत सुवर्णपदकावर कब्जा केला होता.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारत