शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून 'स्पेशल' गिफ्ट; 'ही' एक गोष्ट वेधतेय लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 8:51 PM

Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला.

Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजच्या या सुवर्णकामगिरीनं त्याला स्टार बनवलं... जाहीरातीतही त्यानं क्रिकेटपटू लोकेश राहुलला मागे टाकले. बऱ्याच मॅगझिनच्या फ्रंटपेजवर तो झळकतोय...  त्याचं हे पदक भारतासाठी खूप खास ठरल्यानंच त्याच्यावर हा  वर्षाव  होत आहे. त्यात उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी  नीरजला दिलेलं वचन  पूर्ण केलं. 

मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोडक्यात ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. फोटो फिनिशमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅलकॉल्म स्पेन्सने कांस्यपदक जिंकले. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूला पोडियम ( अव्वल तिघांत) फिनिशमध्ये पाहण्यासाठी १२५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. या ऐतिहासिक विजयानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी नीरजला स्पेशल गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते. 

एका ट्विटर युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याची मागणी केली होती. त्यावर महिंद्रा यांनी रिप्लाय दिला अन् त्यांनी त्यांच्या कंपनीतील दोन व्यक्तींना टॅग करून  नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितली होती.  आनंद महिंद्रा यांनी हे वचन पाठलं आणि नीरजला गाडी गिफ्ट म्हणून पाठवली. इतकेच नव्हे तर त्या गाडीवर ८७.५८ असे लिहिलेलं पाहायला मिळत आहे. नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेकून सुवर्ण जिंकले आणि त्यामुळेच त्याच्यासाठी ही खास गाडी तयार करण्यात आली आहे. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Anand Mahindraआनंद महिंद्रा