शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीमधून मायदेशी परतणार नीरज चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:12 IST

२२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.

नवी दिल्ली : टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा कोरोनामुळे तुर्कस्थानमधून भारतात परतणारआहे. २२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,‘ तुर्कस्थान १८ मार्चला त्यांच्या सीमा बंद करणार असून त्याआधी नीरजला भारतात परतावे लागेल. तो बुधवारी मायदेशी पोहचेल. तसेच तो डायमंड लीगमध्ये १७ एप्रिलला होणाºया दोहा येथील सत्रातही सहभागी होणार नाही.’डायमंड लीगच्या पहिल्या तीन स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे याआधीच आयोजकांनी स्पष्ट केले.अन्य भालाफेकपटू शिवपाल सिंगही द. आफ्रिकेतून परतणार आहे. त्यानेही टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. एएफआय अधिकाºयाने म्हटले की,‘ शिवपालही द. आफ्रिकेतून येत आहे. कोणताही भारतीय खेळाडू विदेशात सराव करत नाही. अशी स्थितीत कोणताही देश सीमा बंद करु शकतो. त्यामुळे आम्ही धोका पत्करणार नाही.’ (वृत्तसंस्था)

डायमंड लीगच्या सर्व स्पर्धा रद्दपॅरिस : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डायमंड सर्किटच्या तीन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यात दोहा येथे १७ एप्रिल मध्ये होणारी स्पर्धा, शांघाई येथे १६ मे रोजी होणारी व चीनमधील ९ मे रोजी होणारी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा निर्णय आयोजन समिती, स्थानिक अधिकारी, क्रीडा संघटनांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.जर्मन फुटबॉल स्थगितफ्रॅँकफर्ट : जर्मनीमधील आघाडीच्या २६ फुटबॉल क्लबने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जर्मन फुटबॉल लीग स्थगित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुंदेसलिगा व दुसऱ्या दर्जाच्या संघांनी फ्रॅँकफर्ट येथे झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. जमर्न फुटबॉल लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारीक्रिस्टियन सिफर्ट म्हणाले, ‘हा निर्णय झाला असला तरी यानंतर आम्ही लगेच सामने सुरु करणार आहोत असे नाही. ही लीग कधी सुरु होईल हे आताच सांगता येणार नाही. ’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारत