शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Neeraj Chopra: लॉरियस पुरस्कारासाठी नीरज चोप्राला नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 11:39 IST

Neeraj Chopra: क्रीडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला नामांकन मिळाले आहे.

नवी दिल्ली : क्रीडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला नामांकन मिळाले आहे. ‘ब्रेक थ्रू’ पुरस्कारासाठी नीरजला मानांकन लाभले आहे. ब्रिटनची टेनिस स्टार एमा राडूकानू आणि अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बिलेस यांच्यासह एकूण सहा खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. एप्रिल महिन्यात एका व्हर्च्युअल सोहळ्याद्वारे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यंदाच्या वर्षी सात गटांमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडणार असून यासाठी नामांकने जगातील १३०० हून अधिक क्रीडा पत्रकार आणि प्रसारकांनी निवडली आहेत. ७१ दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या लॉरियस जागतिक क्रीडा अकादमीद्वारे विजेत्या खेळाडूंची निवड होईल. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीराज हा नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय आहे. बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेतला होता. गेल्या वर्षी टोकियो येथे ऑलिम्पिक पदार्पणात नीरजने सुवर्णफेक करत इतिहास रचला होता. 

तिसरा भारतीय!या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा नीरज केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी मल्ल विनेश फोगाट आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०११ सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी सचिनला खांद्यावर घेत वानखेडे स्टेडियमवर फेरी मारली होती. हा क्रीडाविश्वातील सर्वोत्तम भावनिक क्षण असल्याचे ठरवत आयोजकांनी सचिनला सन्मानित केले होते. 

लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासाठी अत्यंत सन्मानजनक आहे. टोकियोमध्ये माझ्या पदकाला जागतिक ओळख मिळाली. आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करुन पदक जिंकण्याचा आनंद वेगळाच आहे. इतक्या शानदार खेळाडूंसह मलाही नामांकन मिळाले, ही गर्वाची बाब आहे.     - नीरज चोप्रा

ब्रिटनची युवा टेनिसपटू एमा राडूकानूलाही ब्रेक थ्रू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. तिने वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. दानिल मेदवेदेव (टेनिस), पेड्री (फुटबॉल), यूलिमार रोजास (ॲथलेटिक्स), एरियार्ने टिटमस (जलतरण) यांनाही नामांकन मिळाले.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारत