विजयाची गरज होती : वॉर्नर
By Admin | Updated: May 13, 2015 00:14 IST2015-05-13T00:14:56+5:302015-05-13T00:14:56+5:30
इंडियन प्रिमीयर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे

विजयाची गरज होती : वॉर्नर
हैदराबाद : इंडियन प्रिमीयर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला आनंद झाला आहे. किंग्ज इलेव्हनचा पराभव केल्यानंतर प्रतिक्रिया देताना वॉर्नर म्हणाला, ‘‘आम्हाला या विजयाची गरज होती. आम्हाला यानंतरही सामने खेळण्याची संधी मिळणार आहे; पण सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत विजय मिळविणे आवश्यक होते. आम्ही या लढतीत योजनाबद्ध खेळ केला. आमचे लक्ष गुणतालिकेतील स्थान कायम राखण्यावर केंद्रित झाले होते.’’