सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मेहनत घेण्याची गरज - हीना सिद्धू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:47 IST2018-05-08T00:47:40+5:302018-05-08T00:47:40+5:30
कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंकण्याची तयारी करीत आहे. विश्वचषकाचे आयोजन जर्मनीत २२ ते २९ मे या कालावधीत होईल.

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मेहनत घेण्याची गरज - हीना सिद्धू
नवी दिल्ली - कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंकण्याची तयारी करीत आहे. विश्वचषकाचे आयोजन जर्मनीत २२ ते २९ मे या कालावधीत होईल.
राष्टÑकुलमध्ये २८ वर्षांच्या हीनाने २५ मीटर पिस्तूल प्रकारात नव्या विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ती रौप्याची मानकरी होती. हीना म्हणाली, ‘मी ८ - २१ मे या कालावधीत फोर्जहेम येथे सराव करणार आहे. महिन्याअखेर विश्वचषक खेळायचा असून कामगिरीत सातत्य राखण्यावर मी भर देणार आहे. राष्टÑकुल व त्यानंतर कोरियात झालेल्या विश्वचषकात मी दमदार कामगिरी केली. गुणसंख्येवर नजर टाकल्यास राष्टÑकुलच्या तुलनेत विश्वचषकात मी अधिक गुण मिळवले पण पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे आता कामगिरीत सातत्य राखण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. नेमबाजीत बदल घडल्याने आम्ही सात-आठ दिवस सतत नेम साधत असतो.’ (वृत्तसंस्था)