कडक पाऊल उचलणे गरजेचे - गावस्कर
By Admin | Updated: January 21, 2016 13:20 IST2016-01-21T06:50:34+5:302016-01-21T13:20:47+5:30
काही खेळाडू अनेक वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा करुन त्याच चुका वारंवार करत आहेत. भारतीय संघाबाबत कडक पाऊल उचलणे आवश्यक आहे.

कडक पाऊल उचलणे गरजेचे - गावस्कर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - काही खेळाडू अनेक वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा करुन त्याच चुका वारंवार करत आहेत. भारतीय संघाबाबत कडक पाऊल उचलणे आवश्यक आहे असे मत भारताचा माजी फंलदाज सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभवामुळे भारतीय संघाबाबत कडक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचीही मागणी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केली आहे. पुढील विश्वचषकाचा विचार करता भारतीय संघात काही युवा धडाकेबाज खेळाडूंचा समावेश करावा लागेल असेही ते म्हणाले.