भारताविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करणे गरजेचे : सॅमी
By Admin | Updated: March 3, 2015 23:47 IST2015-03-03T23:47:59+5:302015-03-03T23:47:59+5:30
टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे; त्यामुळे या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. ‘

भारताविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करणे गरजेचे : सॅमी
पर्थ : टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे; त्यामुळे या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. ‘‘भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग ३ विजय मिळविले आहेत़ चौथ्या लढतीतही हा संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल़ त्यामुळे आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूला शंभर टक्के योगदान द्यावे लागेल, असे मत विंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने व्यक्त केले आहे़