विजयासाठी गोलंदाजांकडून भरीव कामगिरीची गरज : क्लार्क
By Admin | Updated: August 2, 2015 01:21 IST2015-08-02T01:21:49+5:302015-08-02T01:21:49+5:30
एजबस्टन येथील तिसरा कसोटी सामना ८ गड्यांनी गमावल्यानंतर अॅशेस मालिकेत आॅस्ट्रेलिया संघ इंग्लंडकडून १-२ असा माघारला आहे. तथापि, पुढील दोन सामने जिंकण्यासाठी गोलंदाजांना भरीव योगदान

विजयासाठी गोलंदाजांकडून भरीव कामगिरीची गरज : क्लार्क
बर्मिंगहॅम : एजबस्टन येथील तिसरा कसोटी सामना ८ गड्यांनी गमावल्यानंतर अॅशेस मालिकेत आॅस्ट्रेलिया संघ इंग्लंडकडून १-२ असा माघारला आहे. तथापि, पुढील दोन सामने जिंकण्यासाठी गोलंदाजांना भरीव योगदान द्यावे लागेल; शिवाय कर्णधार म्हणून स्वत:चा खेळही उंचावण्याचे आव्हान असेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त केले. स्टीव्हन फिनच्या ८ तसेच जेम्स अॅण्डरसनच्या ७ बळींमुळे इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात १३६ तसेच दुसऱ्या डावात २६५ धावांत गुंडाळले होते. इंग्लंडला विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर ते त्यांनी २ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. सामन्यानंतर क्लार्क म्हणाला, ‘‘गोलंदाजांसाठी हा सामना शानदार होता. आकाश ढगाळ होते, शिवाय हलक्या सरी बरसत होत्या. आमचे गोलंदाज लाईन आणि लेंग्थ राखून गोलंदाजी करताना दिसले नाहीत. संपूर्ण सामन्यादरम्यान चेंडू स्विंग होताना दिसला.’’ क्लार्कने स्वत:वरही टीका केली. तो म्हणाला, ‘‘मी आतापर्यंतच्या ६ डावांत केवळ ९४ धावा केल्या. माझ्या मते, इंग्लंडचा संघ आमच्यावर वरचढ झाल्याने त्यांना नमविणे कठीण होत आहे. आता माझ्याकडून योगदानाची वेळ आली आहे. कर्णधार या नात्याने जे कर्तव्य करायला हवे ते आतापर्यंत केले नाही, असे मला कळून चुकले आहे.’’ (वृत्तसंस्था)