‘डेथ ओव्हर’मध्ये सुधारणा आवश्यक

By Admin | Updated: September 7, 2014 02:44 IST2014-09-07T02:44:44+5:302014-09-07T02:44:44+5:30

पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी ‘डेथ ओव्हर’मध्ये गोलंदाजी सुधारणो आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Need improvement in 'death over' | ‘डेथ ओव्हर’मध्ये सुधारणा आवश्यक

‘डेथ ओव्हर’मध्ये सुधारणा आवश्यक

लीड्स : भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या वेगवान गोलंदाजांना इशार देताना, पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी ‘डेथ ओव्हर’मध्ये गोलंदाजी सुधारणो आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाला शुक्रवारी पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला; मात्र या मालिकेत भारताने 3-1 ने विजय मिळविला. 
धोनी म्हणाला, ‘‘डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये सुधारणा होणो आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील परिस्थिती वेगळी असेल. आम्हाला विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडमध्ये बरेच सामने खेळावे लागणार आहेत. तेथील मैदाने आकाराने लहान आहेत. त्यामुळे 4क् व्या षटकांनंतर तेथे फिरकीपटूंचा वापर करता येत नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त दडपण राहणार असून, त्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.’’ भारताला विंडीजविरुद्ध मायदेशात पाच वन-डे सामन्यांची मालिका खेळावी लागणार असून, त्यानंतर भारतीय संघ जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. यात तिसरा संघ इंग्लंड आहे.
धोनी पुढे म्हणाला, ‘‘भविष्याचा विचार करता आगामी मालिका महत्त्वाच्या आहेत. विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेमध्ये दवाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना यॉर्कर टाकण्यास अडचण भासण्याची शक्यता असून, रिव्हर्स स्विंगला मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या तुलनेत त्यावेळी परिस्थिती वेगळी राहणार आहे.’’
52 धावांच्या मोबदल्यात 2 बळी घेणा:या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची प्रशंसा करताना धोनी म्हणाला, त्याने अखेरच्या षटाकामध्ये चांगला मारा केला. त्याची गोलंदाजी प्रभावी होती. (वृत्तसंस्था)
 
4धोनीने पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय संघाच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार ठरविले. चुकीचे फटके खेळून फलंदाजांनी विकेट गमाविल्या, अशी प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली. 
4सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला,‘‘आमची गोलंदाजी साधारण होती. फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल होती आणि 3क्क् धावांचे लक्ष्य गाठणो शक्य होते. मधल्या षटकांमध्ये आमचे फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. विकेट गमाविल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणो अशक्य होते.

 

Web Title: Need improvement in 'death over'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.