अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे बीसीसीआयच्या कामात पारदर्शकता असणे आवश्यक : क्रीडामंत्री
By Admin | Updated: August 4, 2015 22:53 IST2015-08-04T22:53:35+5:302015-08-04T22:53:35+5:30
देशातील अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कार्यात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने

अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे बीसीसीआयच्या कामात पारदर्शकता असणे आवश्यक : क्रीडामंत्री
नवी दिल्ली : देशातील अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कार्यात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असल्याचे म्हटले आहे, असे मत क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.
बीसीसीआयला माहितीच्या अधिकार कक्षेत आणायला पाहिजे का, याबाबत सोनोवाल म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असल्याचे
म्हटले आहे. यापूर्वीही मी याचा हवाला दिला आहे.’’
कोपेनहेगेनमध्ये विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय तिरंदाजांच्या सत्कार समारंभादरम्यान पत्रकारांसोबत बोलताना सोनोवाल म्हणाले, ‘‘देशातील क्रीडाप्रेमींना आशा आहे, की सर्व क्रीडा महासंघांच्या दैनंदिन कार्यामध्ये पारदर्शकता असावी. बीसीसीआय प्रदीर्घ कालावधीपासून खासगी संस्था असल्याचे मत व्यक्त करीत आहे, कारण ते शासनाकडून कुठलाही निधी घेत नाहीत; पण सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असून त्यांच्या कार्याची समीक्षा करता येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयला आरटीआय अधिनियमाखाली आणण्याचे सरकारला नवे अस्त्र मिळाले आहे.’’
दरम्यान, रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना सरकारतर्फे पूर्ण मदत दिली जाईल, असे आश्वासन यांनी सोनोवाल यांनी
दिले. भारतीय तिरंदाज रियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यात यशस्वी ठरतील, अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
तिरंदाजीमध्ये भारताचे ४ खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी माझी व रिमिल बुरुली यांचा समावेश असलेल्या महिला रिकर्व्ह संघाने विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावून कोटा स्थान मिळवले.
पुरुष विभागात मंगलसिंग
चम्पियाने आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. (वृत्तसंस्था)