तर खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये मोठय़ा बदलाची गरज
By Admin | Updated: September 2, 2014 19:35 IST2014-09-02T19:35:58+5:302014-09-02T19:35:58+5:30

तर खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये मोठय़ा बदलाची गरज
>कराची: र्शीलंकेमध्ये संघाच्या ढिसाळ कामगिरीवर चिंता व्यक्त करताना महान क्रिकेटर जावेद मियाँदाद आणि अब्दुर कादिर यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मानसिकतेमध्ये मोठे बदल घडवून आणण्याची गरज आह़े मियाँदाद म्हणाले, सध्याच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रत्येक वेळी टीका करणे आणि त्यांना दोषी ठरवण्यात कोणताही फायदा नाही़ काहीही बदलणार नाही़ मात्र या खेळाडूंमध्ये सातत्यचा अभाव आहे आणि धावांसाठी एवढे भुकलेले नाहीत की जसे आमच्यावेळी असायच़े माजी लेग स्पिनर कादिर यांच्या मते संघामध्ये र्शीलंकेकडून मिळालेल्या पराभवाने असे संकेत दिले आहेत की संघामध्ये आवड-नाआवडीची संस्कृती होती़ दुर्दैवाने क्रिकेट मंडळामध्येदेखील आमच्याकडे क्रिकेटला चांगल्या पद्धतीने पारखणारे लोक नाहीत़ ते पक्षपाताविना एखादाही निर्णय घेण्यासाठी तयार नाही़हे सर्वच जण संघाच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार आहेत़