एनबीए बास्केटबॉलचा हिरो निवृत्त,फेअरवेल सामन्यात अर्धशतक
By Admin | Updated: April 14, 2016 20:42 IST2016-04-14T20:33:43+5:302016-04-14T20:42:28+5:30
आपल्या २० वर्षाच्या कारर्किदीतील शेवटच्या सामन्यात ब्रायंट कोबेच्या अफलातून खेळाच्या जोरावर लॉस एंजेलिस लॅकर्स संघाने एनबीए स्पर्धेत ६० गुण नोंदविताना आपल्या संघाला

एनबीए बास्केटबॉलचा हिरो निवृत्त,फेअरवेल सामन्यात अर्धशतक
लॉस एंजेलिस लॅकर्स संघाकडून यूटा जैज १०१-९६ गुणांनी पराभूत
लॉस एंजेलिस : आपल्या २० वर्षाच्या कारर्किदीतील शेवटच्या सामन्यात ब्रायंट कोबेच्या अफलातून खेळाच्या जोरावर लॉस एंजेलिस लॅकर्स संघाने एनबीए स्पर्धेत ६० गुण नोंदविताना आपल्या संघाला यूटा जैज संघाविरुद्ध १०१-९६ गुणांनी विजय मिळवून देत बास्केटबॉल कोर्टला अलविदा केले.
गुरुवारच्या झालेल्या या लढतीच्या सुरुवातीपासून कोबेने वर्चस्व राखले. शेवटचे ५९ सेकंद असताना त्याने ३ थ्री-पॉइंटर तर ३१ सेकंद असताना १ थ्री-पॉइंटर शॉट मारून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
चौथ्या सत्रात त्याने २३ गुण नोंदविले. सामना संपण्यासाठी ४.१ सेकंद राहिले असताना लॅकर्स संघाने १७ गुणांनी आपला विजय निश्चित केला. कोबेने २००९ मध्ये केलेल्या ५० गुणांचा विक्रम आज मोडीत काढला. पराभूत संघाकडून ट्रेय लेलिजने १८ व गॉडर्न हेवडसने १७ गुण केले. कोबेचा हा फेअरवेल सामना पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांसह बास्केटबॉलमधील आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.