शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नवोदित 'मुंबई श्री'चे पीळदार द्वंद्व शुक्रवारी रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:58 IST

मुंबई व उपनगरातील 200 पेक्षा अधिक उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू सज्ज

मुंबईशरीरसौष्ठवपटूंसाठी "बालवाडी" असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा गर्दीमय पीळदार सोहळा येत्या शुक्रवारी 29 नोव्हेंबरला कांदिवली पश्चिमेला असलेल्या महावीर नगराजवळील शाम सत्संग भवनात रंगणार आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना संयुक्तपणे उदयोन्मुख आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी 'हक्काचे व्यासपीठ' असलेल्या 'नवोदित मुंबई श्री' चे पुन्हा एकदा दिमाखदार आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे यंदा महावीर नगरात नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे आखीवरेखीव थरार पाहायला मिळणार हे निश्चित.

 दिवसेंदिवस शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून हिवाळ्यात डंबेल्स मारून बेटकुळ्या काढण्याचे प्रमाणही तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेय. अशाच हौशी आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्याच शरीरसौष्ठवाची आवड वाढावी म्हणून संघटनेने नवोदित मुंबई श्री या स्पर्धेलाही ग्लॅमरस केले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतही नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळी स्पर्धेसाठी नवोदित खेळाडू प्रचंड संख्येने तयारीत करीत असून प्रत्येक गटात 40 ते 50 खेळाडू उतरणार असल्याची माहिती उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे  अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई शरीरसौष्ठवाला नवे खेळाडू मिळणार आहेत, हे विशेष.

स्पर्धा आयोजनासाठी संघटकांचा पुढाकार

यंदाची नवोदित मुंबई श्री जोरदार व्हावी म्हणून टेक्नोक्राट्स कोहलौर इफ्रास्ट्रक्चरने आर्थिक सहकार्याचा हात दिला. मात्र ते सहकार्य पुरेसे नव्हते. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरीरसौष्ठवाच्या अजय खानविलकर, शंकर कांबळी, विजय झगडे, अशोक शेलार, अँथनी जोसेफ, राम नलावडे, सचिन जाधव, राजेंद्र गुप्ता, सुनील शेगडे, संतोष दुबे, राजेश सावंत ,किट्टी फोन्सेका या सक्रिय संघटकांनी पुन्हा एकदा आपल्या खिशात हात घालून या स्पर्धेसाठी पुरेसा निधी उभारला. यामुळे नवोदितांची स्पर्धा दिमाखदार होईलच सोबतीला लाखाची रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. एकंदर सात गटांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल पाच खेळाडूंना 5, 4, 3, 2 आणि 1 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेचा विजेता 15 हजार रूपयांचा मानकरी ठरेल.

 

वेळेवर सुरू होणार स्पर्धा

स्पर्धकांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्यामुळे खेळाडूंची वजन तपासणी त्याचदिवशी दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान स्पर्धास्थळी घेतली जाणार आहे. स्पर्धेला वेळेचे बंधन असल्यामुळे दोनशेच्या आसपास खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा वेळेत संपन्न व्हावी म्हणून सायंकाळी पाच वाजताच सुरू करणार असल्याचे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर यांनी सांगितले. स्पर्धेसाठी खेळाडू मोठ्या संख्येने तयारी करीत असल्यामुळे  अधिक माहितीसाठी सुनील शेगडे (9223348568), प्रभाकर कदम (9757134952) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई