नवी मुंबई विजेतेपदासाठी लढणार

By Admin | Updated: December 28, 2015 03:23 IST2015-12-28T03:23:21+5:302015-12-28T03:23:21+5:30

नवी मुंबई स्पोटर््स असोसिएशनने ६० धावांनी सहज विजय मिळवताना माझगाव क्रिकेट क्लबचा पराभव करून ६१व्या बाळकृष्ण स्मृती बापट ढाल उपनगरीय क्रिकेट

Navi Mumbai will contest for the winner | नवी मुंबई विजेतेपदासाठी लढणार

नवी मुंबई विजेतेपदासाठी लढणार

मुंबई : नवी मुंबई स्पोटर््स असोसिएशनने ६० धावांनी सहज विजय मिळवताना माझगाव क्रिकेट क्लबचा पराभव करून ६१व्या बाळकृष्ण स्मृती बापट ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अन्य सामन्यात मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लबने अंतिम फेरी गाठताना अचिव्हर्स स्पोटर््स क्लबचे आव्हान ३ विकेट्सने संपुष्टात आणले.
कुर्ला स्पोटर््स क्लबच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना एकतर्फी झाला. आशिष म्हात्रे (५४) आणि सचिन शिंदे (५१) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नवी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २२६ अशी मजल मारली. पंकज पाटीलने ४२ धावांत ३ बळी घेत नवी मुंबईला रोखण्याचे प्रयत्न केले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या माझगाव संघाचा डाव केवळ १६६ धावांत संपुष्टात आणून नवी मुंबईने ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. आदित्य शेंमडकर (७८) आणि पंकज (नाबाद ३३) यांची झुंजार खेळीदेखील माझगावचा पराभव टाळू शकली नाही.
दुसऱ्या बाजूला रंगतदार झालेल्या सामन्यात ठाण्याच्या मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लब संघाने कुर्लाच्या अचिव्हर्स स्पोटर््स क्लबला ३ विकेट्सने नमवले. सिद्धेश मोरेने (३/२६) केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर मांडवी संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या अचिव्हर्स संघाला १४१ धावांत गुंडाळले.
सुमेध कांबळे याने सर्वाधिक
४१ धावा काढून संघाला शतकी
मजल मारून दिली. यानंतर धावांचा पाठलाग करताना मांडवी संघाचा डावही अडखळला. मात्र प्रकाश आसवानी (६२) आणि राहुल भट्ट (नाबाद २२) यांनी निर्णायक खेळी करून संघाला अंतिम फेरीत नेले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Navi Mumbai will contest for the winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.