पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:28 AM2019-08-29T11:28:44+5:302019-08-29T11:29:20+5:30

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली.

National Sports Day: Prime Minister Narendra Modi launches Fit India Campaign | पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा

पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा

Next

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर मोदींनी फिट इंडिया मोहिमेचे महत्त्व समजावून सांगताना खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी असल्याचं सांगितलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी महान हॉकीपटू ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. त्यांनी तंदुरुस्तीचं महत्व सांगताना तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कसे कमी झाले, यावरही प्रकाश टाकला. या मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 


ते म्हणाले,'' मागील पाच वर्षांत क्रीडा क्षेत्रात सुधारणेसाठी प्रयत्न झाले. त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज विविध खेळात भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. त्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो. बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती आदी खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अपेक्षा उंचावल्या आहेत.  त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक पदकातून त्यांचे परिश्रम आणि त्याग दिसून येतो. हा नव्या भारताचा जोश आहे.''

खेळाचं थेट नातं तंदुरूस्तीशी आहे आणि त्यामुळेच फिट इंडिया मोहिम प्रारंभ करत आहे. पण, काळानुसार बरेच काही बदलले असल्याचे सांगत मोदींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,'' निरोगी होणं मोठ भाग्य आहे, व्यायामामुळे निरोगी राहता येतं. चांगल्या स्वास्थामुळे चांगली कार्य सिद्धीस नेता येतात. पण, आता काळ बदलला आहे. एक उदाहरण देतो, काही दशकांपूर्वी सामान्य व्यक्ती दिवसात 8-10 किलोमीटर सहज चालायचा. पण, हळुहळू तंत्रज्ञान आले, आधुनिक साधन आले आणि लोकांचं चालणं कमी झालं. आता परिस्थिती अशी आहे की, तंत्रज्ञामुळे आपले चालणे कमी झाले आणि तेच तंत्रज्ञान आपण किती चालावे हे आपल्याला सांगत आहे. 






 

Web Title: National Sports Day: Prime Minister Narendra Modi launches Fit India Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.