शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 19:04 IST

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सचिन कोरडे, पणजी : विविध अडथळ्यांच्या गर्तेत अडकलेली आणि वादग्रस्त ठरत असलेली गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयास तशा आशयाचे पत्र लिहिले आहे. या पत्रात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सुरक्षा या मुख्य कारणांना पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे असे झाल्यास ही स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडणार आहे. स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीवरून यापूर्वीच (पान १ वरून) गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातून साशंकता व्यक्त होत होती. त्यात आता आणखी भर पडली.  येत्या ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल, असे निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तांत्रिक समिती, आयोजन समिती आणि संघटनांचे संचालक कामालाही लागले होते. साधनसुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.  विविध क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंच्या निवड चाचणी घेण्यात आल्या. विविध विभागांची एकत्रितपणे बैठक घेऊन अहवालही तयार करण्यात आले होते. गेल्या महिन्यात भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या बैठकीत स्पर्धेचे सादरीकरण झाले होते. त्यात स्पर्धेचे संयुक्त सचिव व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी मार्चपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही आयओएला दिले होते. आता आयओएकडे राज्य सरकारने पुन्हा समस्यांचा पाढा वाचला आहे. विविध क्रीडा प्रकारांसाठी ग्लोबल निविदा काढण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ही स्पर्धा नियमित वेळेवर होईल, असे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि.९) राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून क्रीडा क्षेत्राला जबर धक्का दिला. यासंदर्भात, एका अधिकाºयाने स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीच्या काळातच ही स्पर्धा आहे. त्यामुळे या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. सुरक्षेचाही मुद्दा आहे. मनुष्यबळही अधिक लागते तसेच याच काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा आहेत. स्पर्धेसाठी स्वयंसेवकही मिळणार नाहीत. या सर्व समस्या एकाच वेळी आल्या आहेत. सरकारपुढेही पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे करण्यात आली आहे. यजमानांची तारीख पे तारीख....राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी २००८ मध्ये गोव्याचे नाव पहिल्यांदाच पुढे आले होते. त्या वेळी गोव्याने ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर २०११ मध्ये स्पर्धेचे अधिकृत यजमानपद गोव्याला मिळाले. २०११ नंतर पुन्हा २०१५ साठी गोवा चर्चेत आला होता. मात्र त्या वेळी ही स्पर्धा केरळ येथे हलविण्यात आली. २०१७ पासून या स्पर्धेच्या आयोजनावरून गोवा चर्चेत आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने गोव्याच्या आयोजनाच्या तयारीवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. २ ते १७ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पर्धेसाठी आणखी वेळ द्या. आम्ही तयारी पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर गोव्याला ३० मार्च ते १४ एप्रिल अशी नवी तारीख देण्यात आली होती.बोधचिन्ह अनावरणाला मुहूर्त मिळेना...स्पर्धेचे बोधचिन्ह म्हणून निवडण्यात आलेल्या ‘रुबीगुला’चे अनावरणही दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आले होते. या बोधचिन्हाच्या अनावरणाची २० डिसेंबर ही पहिली तारीख निश्चित झाली होती. त्यानंतर ती जानेवारीत ढकलण्यात आली. जानेवारीचा दुसरा आठवडा संपत येत असूनही बोधचिन्ह अनावरणासाठी सरकारला मुहूर्त मिळाला नाही.

टॅग्स :goaगोवा