शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राष्ट्रीय पिकलबॉल : महाराष्ट्राच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक, पुरुष व महिला गटात राखला दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 21:54 IST

बलाढ्य महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना, पुरुष व महिला गटात प्रत्येकी ७५ गुणांची कमाई करत, पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेच्या सांघिक जेतेपदावर कब्जा केला.

मुंबई : बलाढ्य महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना, पुरुष व महिला गटात प्रत्येकी ७५ गुणांची कमाई करत, पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेच्या सांघिक जेतेपदावर कब्जा केला. विशेष म्हणजे, सलग तिस-यांदा जेतेपद पटकवताना महाराष्ट्राने दिमाखदार हॅट्ट्रिक नोंदवत आपला दबदबा राखला. त्याच वेळी महाराष्ट्राच्या धडाक्यापुढे कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थानने पुरुष गटात ४०, तर महिला गटात ५० गुण मिळविले. अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (आयपा) वतीने आणि प्रथमच कर्नाटक राज्य पिकलबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली बंगळुरू येथील तेरापंथ समाज, भिक्षू धाम जैन प्रार्थना सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने ४ विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व राखले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात कुलदीप महाजनने झारखंडच्या सोनू कुमार विश्वकर्मा याचे आव्हान ११-७, ११-७ असे परतावत दिमाखदार जेतेपद पटकावले. महिला गटात अंतिम सामना महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये रंगला. यामध्ये वृशाली ठाकरेने बाजी मारताना पूजा वाघ हिला ११-२, ११-१ असे सहज नमविले. पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या अभिजीत मढभवी - सौमित्र कोरगावकर यांनी अपेक्षित सुवर्ण जिंकताना कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थानच्या निखिल सिंग राजपूत-प्रशांत कलानी यांचा ११-९, ११-९ असा पराभव केला. त्याच वेळी मिश्र दुहेरीत अनुभवी अतुल एडवर्ड  आणि युवा साक्षी बाविस्कर या तगड्या जोडीला सुवर्ण पदकासाठी झुंजावे लागले. मात्र, मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना अतुल - साक्षी यांनी राजस्थानच्या नीरज शर्मा - मेघा कपूर यांचा ११-४, ६-११, ११-८ असा पाडाव केला. - महिला दुहेरी गटामध्ये राजस्थानचे वर्चस्व राहिले. राजस्थानच्या नीतू शर्मा - मधुलीका या जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिव्या पवार - क्रितिका गिरी या मध्य प्रदेशच्या जोडीचा ११-३, ९-११, ११-४ असा पराभव केला. 

टॅग्स :Sportsक्रीडा