राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्र मुलींचा संघ अजिंक्य
By Admin | Updated: October 12, 2014 21:48 IST2014-10-11T23:08:27+5:302014-10-12T21:48:13+5:30
नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकबरोबर सामना होणार आहे. राज्याच्या मुलांच्या संघाने सलग ९ वेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविले आहे. तर मुलींच्या संघाला कर्नाटक संघाकडून गतवर्षी १ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड त्यांनी कर्नाटकचा १०-७ गुण मिळवून ३ गुणांनी पराभव करत केली.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्र मुलींचा संघ अजिंक्य
नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकबरोबर सामना होणार आहे. राज्याच्या मुलांच्या संघाने सलग ९ वेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविले आहे. तर मुलींच्या संघाला कर्नाटक संघाकडून गतवर्षी १ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड त्यांनी कर्नाटकचा १०-७ गुण मिळवून ३ गुणांनी पराभव करत केली.
अजमेर, राजस्थान येथे राष्ट्रीय स्तरावरील कुमार गटाच्या खो-खो स्पर्धा सुरु असून, रात्री उशिरा अंतिम सामने होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुलांच्या संघाने पश्चिम बंगाल विरुद्ध १६-११ गुण मिळवून १ डाव ५ गुणांनी विजय मिळविला. या सामन्यात स्वप्नील चिकणे १ मि. २० से. व १.१० संरक्षण करून ५ गडी बाद केले. अनिकेत पोटेने १ मि. ४० से. संरक्षण तर ३ गडी बाद केले. तानाजी सावंत, संदेश महाडिक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर सागर घागने २ मिनिट आणि १ मि. ४० सेकंद संरक्षण करून संघाच्या विजयाला हातभार लावला.
मुलींच्या संघाने ओरिसावर १२-७ गुण मिळवून १ डाव ५ गुणांनी विजय मिळवित मुलीही काही कमी नाही हे दाखवून दिले. या सामन्यात श्वेता गवळी ३ मि. १० से. संरक्षण करीत २ गडी बाद केले. प्रियंका भोपी हीने २ मि. २० से. संरक्षण आणि १ गडी बाद केला. ऐश्वर्या सावंत हिने ३ मिनिट आणि १ मि. ३० से. असे भक्कम संरक्षण करून २ गडी बाद केले. कविता घाणेकरने ३ गडी तर शितल भोर हिने २ गडी बाद करून संघाच्या विजयात वाटा उचलला. (क्रीडा प्रतिनिधी)