शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खो खो स्पर्धा :  महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 23:16 IST

महाराष्ट्राच्या संघाने मध्यभारत संघाचा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला.

मुंबई : अल्बर्ट एक्का खो खो स्टेडियम , रांची , झारखंड येथे चालू असलेल्या  राष्टीय किशोर किशोरी अजिंक्यपद  खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या गतविजेत्या महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी च्या दोंन्ही संघानी आपापले सामने जिंकत आगेकूच केली. 

आज झालेल्या किशोरी  गटाच्या स्पर्धेत महाराष्ट्र  या संघाने मध्यभारत या संघाचा (०२-११-००) ११-०२  असा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रच्या  दिपाली राठोडने १:३०  मिनिटे  संरक्षण केले. आक्रमणात चार गडी बाद केला. संध्या सुरवसे  हिने ४:५० मिनिटे  संरक्षण केले  तर भाग्यश्री बढे  हिने आक्रमणात तीन  गडी बाद केले. मध्य भारत तर्फे  एम सक्सेना  हिने २:००,  मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक   गडी बाद  करत  चांगला खेळ केला.    

आज झालेल्या किशोरी  गटाच्या स्पर्धेत तामिळनाडू  या संघाने दिल्ली  या संघाचा (०९-०५-०६-०८) १५-१३  असा २ गुणांनी पराभव केला. तामिळनाडूच्या जी. एस. मिश्रा  हिने ३:३० , १:२० मिनिटे  संरक्षण केले. आक्रमणात एक गडी बाद केला. टी. नीनाथा हिने २:००, १:०० मिनिटे  संरक्षण केले व आक्रमणात एक  गडी बाद केला . तर दिक्षा हिने आक्रमणात चार गडी बाद केले. दिल्लीतर्फे  नेहा  हिने १:००, ०:५० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात पाच  गडी बाद केले  तर काजल हिने ३:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद करत चांगला खेळ केला.   आज झालेल्या किशोरी  गटाच्या स्पर्धेत  ओडिसा  या संघाने आन्ध्रप्रदेश  या संघाचा (१६-०१-०३) १६-०४ असा एकतर्फी  गुणांनी पराभव केला.  ओडिसा कडून खेळताना अर्चना हिने ४:३० मिनिटे संरक्षण करत  आक्रमणात चार   गडी  बाद करून अष्टपैलू  खेळ केला तर   शुभश्री हिने नाबाद ३:०० मिनिटे संरक्षण केले आक्रमणात  दोन गडी बाद केले. शिवानी हिने २:३० नाबाद  मिनिटे संरक्षण करत  आक्रमणात दोन गडी बाद केले.   आन्ध्रप्रदेशतर्फे ए.  हेमलता हिने  नाबाद  १:२० मिनिटे संरक्षण केले  तर एस. फरिया हिने  आक्रमणात दोन  गडी बाद करत चांगली लढत दिली. आज झालेल्या किशोर  गटाच्या  स्पर्धेत  गुजरात  या संघाने पाँडेचरी या संघाचा (११-११-१७-०४)  २८-१५ असा तेरा  गुणाने पराभव केला.  गुजरात  कडून  परेश याने २:५०, नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणातसहा  गडी बाद केले. तर विनेश  याने २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात सात  गडी बाद केले.  तर अजय  याने आक्रमणात चार  गडी बाद केले. तर पौंडेचरीतर्फे आर. इमाने याने १:२० , १:२० मनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली तर एम. मुगीइन याने  आक्रमणात तीन  गडी बाद करुन चांगली साथ दिली.

आज झालेल्या किशोर  गटाच्या  स्पर्धेत  महाराष्ट्र  या संघाने उत्तराखंड या संघाचा (१२-०२-०२)  १२-०४ असा एक डाव व ८ गुणाने पराभव केला.  महाराष्ट्र  कडून रोशन कोळी याने २:४०,   मिनिटे संरक्षण करत आक्रमणात पाच गडी बाद केले. तर नागेश वसावे   याने १:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार   गडी बाद केले, तर आयुष्य लाड  याने २:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद केले.  

टॅग्स :Kho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र