शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 17:12 IST

महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली.

मुंबई : प.बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या "४५व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. आज महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली. पूर्वार्धात १लोण देत महाराष्ट्राने २३-०९अशी भक्कम आघाडी राखली होती. या मोठ्या आघाडी मुळे प्रशिक्षिका वीणा खवळे (शेलटकर) हिने आपल्या राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी दिली. उत्तरार्धात आणखी १लोण देत हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सोनाली हेळवी, प्रतीक्षा तांडेल यांच्या दमदार चढाया त्याला साक्षी रहाटेच्या पकडीची मिळालेली मजबूत साथ यामुळे हा विजय सोपा गेला.महाराष्ट्राच्या मुलांनी देखील क गटात हिमाचल प्रदेशचा ३५-३१ असा पराभव करीत या गटात अव्वल क्रमांक पटकावित बाद फेरी गाठली. पूर्वार्धात एक लोण देत २२-०९अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात हिमाचलने चांगलेच झुंजवले. लोणची परतफेड करीत हिमाचलने महाराष्ट्राची आघाडी कमी करीत आणली. पण मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचे प्रशिक्षक आयुब पठाण व लक्ष्मण गावंड यांनी खेळाडूंना सामना शांतपणे खेळण्यास प्रवृत्त करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पंकज मोहिते, असलम इनामदार यांचा अष्टपैलू खेळ त्याला शुभम शेळके, सौरभ पाटील यांची मिळालेली चढाईची साथ यामुळे हा विजय मिळविता आला. महाराष्ट्राचा बचाव उत्तरार्धात दुबळा ठरला.

इतर निकाल संक्षिप्त :- मुले १)विदर्भ वि वि छत्तीसगड (४१-३९); २)गोवा वि वि ओडीसा (३४-१९); ३)पॉंडेचरी वि वि विदर्भ (३४-३०) मुली :- १)मध्य प्रदेश वि वि विदर्भ (४७-३२); २)बिहार वि वि उत्तरांचल (५६-३५); ३) उत्तर प्रदेश वि वि तेलंगणा (३४-१४).

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र