पुण्यात रंगणार राष्ट्रीय गोल्फची चुरस
By Admin | Updated: March 17, 2017 00:26 IST2017-03-17T00:26:17+5:302017-03-17T00:26:17+5:30
देशभरातील १२ शहरांमधून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले एकूण ४१ खेळाडू आॅक्सफोर्ड गोल्फ कोर्सवर होणाऱ्या १७व्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील अव्वल गोल्फर्स भिडतील

पुण्यात रंगणार राष्ट्रीय गोल्फची चुरस
पुणे : देशभरातील १२ शहरांमधून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले एकूण ४१ खेळाडू आॅक्सफोर्ड गोल्फ कोर्सवर होणाऱ्या १७व्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील अव्वल गोल्फर्स भिडतील.
शुक्रवारी होणाऱ्या या अंतिम फेरीतून अव्वल ३ खेळाडू जर्मनी येथे होणाऱ्या वर्ल्ड फायनल स्पर्धेसाठी पात्र ठरणार असल्याने या स्पर्धेत मोठी चुरस दिसेल. जर्मनीतील ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडेल. दरम्यान, पुण्यात जानेवारी महिन्यात या स्पर्धेला सुरुवात झाली होती. स्पर्धेदरम्यान अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोइमतूर, चेन्नई, कोलकाता, चंदिगड, गुरगाव, जयपूर व ग्रेटर नोएडा या शहरांमध्ये फेऱ्या पार पडल्या.