नॅशनल गेम्स ऑडिट
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:27+5:302015-02-11T23:19:27+5:30
नॅशनल गेम्सचे ऑडिट

नॅशनल गेम्स ऑडिट
न शनल गेम्सचे ऑडिट४५ दिवसांत : चंडीतिरुअनंतपुरम : केरळमध्ये सुरू असलेल्या नॅशनल गेम्सचे ऑडिट स्थानिक लेखापरीक्षकांच्या कार्यालयामार्फत ४५ दिवसांत पूर्ण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी बुधवारी केली. आयोजनातील उणिवा आणि भ्रष्टाचाराची चर्चा चव्हाट्यावर आल्यामुळे तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पर्धा आटोपताच लवकरात लवकर ऑडिट करण्यास सरकारचे प्राधान्य असेल. ३१ जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनावर मोठी उधळपी झाल्याचा आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री म्हणाले, 'असे काही घडले नाही; शिवाय समारोप सोहळ्याच्या खर्चातही कपात होणार नाही.' २०११मध्ये मंजूर झालेल्या खर्चाची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.(वृत्तसंस्था)०००