National Games 2025, Maharashtra : अल्मोडा : महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वयाच्या बळावर ३८ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या योगासनात सांघिक सुवर्णपदक जिंकले. याशिवाय रौप्य व कांस्य पदकाचीदेखील कमाई केली. सुहानी गिरीपुंजे, छकुली सेलोकर, तन्वी रेडीज, रचना अंबुलकर व पूर्वी किनरे यांनी ११२.१३ गुण नोंदवीत सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या कलात्मक वैयक्तिक प्रकारात सोलापूरचा रुपेल सांगे याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले त्याने ११७.८८ गुणांची नोंद केली. नागपूरच्या सुहानीने पारंपरिक योगासनामध्ये कांस्य जिंकले. तिने ६०.४८ गुणांची नोंद केली.
पूजाची हॅटट्रिक
कोल्हापूरच्या पूजा दानोळने सायकलिंगमध्ये पटकांची हॅटट्रिक पूर्ण केली. पूजाने 3 किमी वैयक्तिक कौशल्य प्रकारात ४ मिनिटे ०४.४२४ सेकंद वेळेसह रौप्य पटकाविले. स्वेता गुंजाळ हिने पाचशे मीटर्स वैयक्तिक कौशल्य क्रीडा प्रकारात कांस्य जिंकून महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातनी
वॉटरपोलोत रौप्य
गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष वॉटरपोलो संघाला चंदा अखेरच्या क्षणी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा महिला संघही रौप्यपदकाचाव मानकरी ठरला. पुरुषांत सेनादलाने सुवर्णपदकाची गवसणी घातली, तर महिलांत केरळने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुष गटाची सुवर्णपदकाची लढत थरारक इथली. सेनादलाने महाराष्ट्र संघावर १०-२ अशी बाजी मारली.
बॅडमिंटन मिश्र दुहेरीत रौप्य
दीप संभिया व अक्षया वारंग या जोडीने बॅडमिंटनमधील मिश्र दुहेरीचे रौप्य जिंकले. के. सतीश कुमार व आद्या वरीयथ या तामिळनाडूव्या अग्रमानांकित जोडीने अंतिम सामना २१-११, २०-२१-८ असा जिंकला, महाराष्ट्राच्या जोडीचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
जलतरणात अखेरच्या दिवशी सहा पदकेमहाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी अखेरच्या दिवशी सहा पदके जिंकली. त्यात हिर शहा आणि सानवी देशवाल यांना उपापल्या गटात रौप्य तर ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर ४ बाय १०० मीटर मिश्र मिडले रीलेतही महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात हिर शहा याने ५९.६१ सेकंद वेळेसह रौप्य जिंकले, महिलांच्या १०० मीटर ग्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सानठी देशवाल हिने १ मितिट १६, ३७ सेकंद वेळेसह रौप्य, तर ज्योती पाटील हिने १ मिनिट १७.३६ सेकंद वेळेसह कांस्य जिंकले.